मराठी शुभेच्छा! - होळी शुभेच्छा! // Marathi Shubecha - Holi Wishesh
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या
खूप खूप शुभेच्छा.
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया अरोळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची
सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा
तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !